अमेरिकेचे सोळावे राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच्याविषयी काही रोचक तथ्ये

lincon
अब्राहम लिंकन (१२ फेब्रुवारी १८०९ – १५ एप्रिल १८६५) हे अमेरिकेचे सोळावे राष्ट्रपती होते. १८६१ सालच्या मार्चमध्ये लिंकन यांनी पदभार स्वीकारला असून, १८६५ साली त्यांची हत्या होईपर्यंत हे या पदावर होते. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित अशा सिव्हील वॉरच्या काळामध्ये लिंकन यांनी देशाचे यशस्वी नेतृत्व केले होते. राष्ट्रपती बनण्यापूर्वी लिंकन अमेरिकन स्टेट्समन असून, तत्पूर्वी वकील म्हणूनही कार्यरत होते. भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या या नेत्याविषयी काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.
lincon1
लिंकन यांचे नाव ‘रेसलिंग हॉल ऑफ फेम’मध्ये नोंदलेले असून, तरुणपणी अतिशय उत्तम मुष्टीयोद्धा म्हणून लिंकन यांचा लौकिक होता. लिंकन यांनी खेळलेल्या मुष्टीयुद्धाच्या तीनशे मॅचेस पैकी केवळ एका मॅच मध्ये लिंकन यांना पराभव पत्करावा लागला होता. बाकी २९९ मॅचेस त्यांनी जिंकल्या होत्या. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा उल्लेख ‘नॅशनल रेसलिंग हॉल ऑफ फेम’मध्ये ‘आउटस्टँडिंग अमेरिकन’, म्हणजेच मुष्टी युद्धामध्ये सर्वोत्कृष्ट असा करण्यात आला आहे. लिंकन यांचे भारदस्त व्यक्तिमत्व पाहता त्यांचा आवाजही तितकाच भारदस्त असेल अशी लोकांची समजूत होत असे, मात्र लिंकन यांचा आवाज काहीसा कर्कश्श असून, या बद्दल ‘काँग्रेस हाय पोस्ट’ या कॉंग्रेस पार्टीच्या ब्लॉग पोस्ट मध्ये टिप्पणीदेखील केली गेली होती. किंबहुना अनेक लोकांना लिंकन यांचा आवाज त्रासदायक वाटत असे. पण लिंकन यांचे भाषेवरील प्रभुत्व आणि वैचारिक क्षमता पाहता त्यांची भाषणे अतिशय लोकप्रिय होत असत.
lincon2
अमेरिकेचे राष्ट्रपती हे अमेरिकन सैन्याचे प्रमुख असतात व ही भूमिका लिंकन यांनी देखील चोख पार पाडली. अनेकदा सैन्यामध्ये नव्याने दाखल झालेल्या रायफल्सची व इतर शस्त्रास्त्रांची चाचणीठी लिंकन स्वतः उपस्थित असत. ते स्वतः देखील अनेकदा नव्या रायफल चालवून चाचणी करीत असत. नवनवीन शस्त्रास्त्रे, यंत्रे यांच्या बद्दल लिंकन यांना नेहमीच कुतुहल असे आणि त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असत. त्यामुळे व्हाईट हाऊस या त्यांच्या औपचारिक निवासस्थानी शास्त्रज्ञांच्या, शोधकर्त्यांच्या बैठकी नेहमीच होत असत.
lincon4
जॉन विल्किस बूथने लिंकन यांची हत्या करण्यापूर्वी अचानक घडलेल्या एका अपघातामध्ये बूथच्या भावाने लिंकन यांच्या मुलाचे प्राण वाचविले होते. झाले असे, की लिंकन यांचा मुलगा रेल्वे स्थानकावर ट्रेन येण्याची वाट पाहत होता. ट्रेन आल्यानंतर त्यामध्ये चढण्यासाठी एकदम उसळलेल्या गर्दीमध्ये धक्का लागून लिंकनचा मुलगा ट्रेन आणि फलाटाच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेतून ट्रेनच्या रुळांवर पडत असता, बूथच्या भावाने त्याच्या शर्टला धरून खेचून बाहेर ओढले, व त्यामुळे एक मोठा अपघात टळला. लिंकन यांच्या मुलाला वाचविणारी व्यक्ती एडविन बूथ असून, एडविन सुप्रसिद्ध अभिनेता होते.
lincon3
१८६५ साली लिंकनची हत्या करण्यात आली, त्यानंतर सुमारे पाच वर्षांच्या नंतर लिंकन यांची कॉफिन उघडून त्यातून लिंकन यांचे अवशेष चोरण्याची व या अवशेषांच्या बदली २००,००० डॉलर्स मागण्याची योजना एका गुन्हेगारी टोळीने आखली होती. पण अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस एजंट्सना या सर्व कटाची कुणकुण आधीच लागल्यामुळे लिंकन यांचे अवशेष त्यांच्या कबरीतून काढून एका निनावी ‘ग्रेव्ह’मध्ये हलविण्यात आले. त्यानंतर लिंकन यांचे अवशेष एका स्टीलच्या कॉफिनमध्ये ठेवण्यात येऊन ही कॉफिन जमिनीच्या खाली दहा फुट पुरण्यात आली, व त्यावर कॉंक्रीट घालण्यात आले.

Leave a Comment