पाकिस्तानी ध्वज – जगातील सर्वोत्तम टॉयलेट पेपर

zenda
जगतील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलवर बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड असे सर्च केले तर त्याचे उत्तर अचंबित करणारे असून हे उत्तर आहे पाकिस्तानी ध्वज. सोशल मिडीयावर हा सर्च व्हायरल झाला आहे. बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड असे नुसते टाईप केले तर अन्य प्रयायात पाकिस्तानी झेंड्याचा फोटो दिसतो आहे. अनेकांनी गुगलवरील या स्क्रीनचा शॉट घेऊन तो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

गुगलवर असा प्रसंग घडण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. त्यापूर्वी इडियट सर्च केले कि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो झळकत होता तर भिकारी सर्च केल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची छबी दिसत होती. हे असे का होते याचा खुलासा गुगलचे सीइओ सुंदर पिचाई यांनी एका कार्यक्रमात केला होता मात्र त्यावर फार चर्चा झाली नव्हती. पिचाई याच्या म्हणण्यानुसार गुगलचा यात काही हात नसून ज्या पद्धतीने सर्च तंत्रज्ञान काम करते त्यामुळे असे घडते.

Leave a Comment