भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानच्या २०० साईट केल्या हॅक

icrew
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या काफिल्यावरील हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने स्वीकारल्यावर लगोलग पाकिस्तानी वेबसाईटवर भारतीय हॅकर्सनी जोरदार हल्ला चढविला असून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासह २०० हून अधिक साईट हॅक केल्या आहेत. आय क्रू नावाच्या हॅकर्स ग्रुपने या साईट हॅक केल्याचा दावा केला आहे.

hack
या साईट उघडल्या कि शहीद जवानांना श्रद्धांजली आणि खाली जळती मेणबत्ती दिसते आहे तसेच भारतीय वायू सेनेच्या विमानांचा ताफा तिरंगी धूर सोडत हवेत उड्डाण करताना दिसतो आहे. या पेजवर असा संदेश आहे, पुलवामा दहशतवादी हल्ला, शहिद जवानांना श्रद्धांजली, सोबत १४/२/१९ आम्ही विसरणार नाही, ज्या वीर जवानांनी जीवाची बाजी लावली त्यांना हे पेज समर्पित.

त्यापुढे आम्ही माफ करायचे? विसरायचे, भारत कधीच हे विसरणार नाही असाही मजकूर आहे. पाक सायबर क्षेत्रावरील हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचे सांगितले जात असून हल्ला झालेल्या काही साईटच्या लिंक खाली दिल्या आहेत.

https://sindhforests.gov.pk/op.html
https://mail.sindhforests.gov.pk/op.html
https://pkha.gov.pk/op.html
https://ebidding.pkha.gov.pk/op.html
https://mail.pkha.gov.pk/op.html

Leave a Comment