अंबानी, महिंद्रा, बिग बीसह अनेकांचा शहीदांसाठी मदतीचा हात

shahid
पुलवामा येथे दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, अमिताभ बच्चन याच्यासह अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी एकीकडे डोळ्यात आसू आणि विरह असे वातावरण आहे तर दुसरीकडे देशभरात सर्व थरातून या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. सरकार आणि विरोधी पक्ष या मुद्द्यावर एकत्र आले असून समाजाच्या सर्व थरातून या ना त्या प्रकारे मदतीची इच्छा व्यक्त केली जात आहे.

देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांनी रिलायंस फाउंडेशनतर्फे शहीद जवानांच्या मुलांचे शिक्षण आणि नोकरी देण्याचे आणि अन्य सर्व ती मदत पुरविण्याची तयारी दर्शविली आहे तर बॉलीवूडमधील बिग बी यांनी प्रत्येक शहीद जवानाच्या परिवाराला ५ लाख रुपये देण्याची इच्छा दर्शविली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मधील कर्मचारी वर्गाने एक दिवसाचा पगार देण्याची घोषणा केली आहे.

क्रीडा क्षेत्रातून क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे तर वीरेंद सेहवाग याने सेहवाग इंटरनॅशनल स्कूल मधून या मुलांना शिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे.

Leave a Comment