विना कपडे करा घराची साफ-सफाई, एका तासाला मिळवा 4100 रुपये

clean
इंग्लंडमधील एक कंपनी साफ-सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असून ही कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्याला ताशी 4100 रुपये पगार देण्यास तयार आहे. पण यासाठी कंपनीने एक अट ठेवली आहे. ती ऐकल्यावर कित्येकजण त्यांची नोकरी नाकारत आहे. या कंपनीचे नाव नेचुरिस्ट क्लिनर्स, असे असून या कंपनी महिला आणि पुरुष असे मोठ्या संख्येत कर्मचाऱ्यांची गरज आहे. पण कंपनीने यासाठी एक अट ठेवली असून त्यानुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांना कपडे न घालता घरांची साफ-सफाई करावी लागणार आहे.
clean1
आमचा सफाई कर्मचारी जाडा असो, काटकुळा असो की म्हतारा असो आम्हाला काही फरक पडत नसल्याचे कंपनी म्हणते. कंपनीला या कामासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नाही. त्यांचे फक्त एवढेच म्हणने आहे, की आमची एक अशी अट आहे ज्यांना काम करायचे आहे, मग तो पुरुष असो स्त्री त्यांना एक ही कपडा न घालता घराची साफ-सफाई करावी लागेल. त्याचबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर एक पर्याय देखील ठेवला आहे, तो असा आहे की ज्यांना आपले प्रायव्हेट पार्ट झाकून काम करायचे असेल त्यांना प्रतितास 2200 रुपये पगार दिला जाईल.
clean2
दरम्यान या कंपनीत सध्याच्या घडीला अनेक कामगार करत आहेत. ज्यात महिलांचा देखील समावेश आहे. तेथे काम करणाऱ्या एक महिला कर्मचाऱ्याचे असे म्हणने आहे की कंपनीचे ग्राहक जास्त करुन पुरुष असून जे एकटे राहतात. त्यात 20 वर्षांपासून 50 वर्षांपर्यताच्या पुरुषांचा समावेश आहे. नेचुरिस्ट क्लिनर्स कंपनीचे असे म्हणने आहे की आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहोत. कर्मचाऱ्यांची सुरक्षितेला आमच्याकडून प्रथम प्राधान्य आहे.

Leave a Comment