आता येत आहे गडकरींचा बायोपिक, ट्रेलर रिलीज

nitin-gadkari
2019साली बॉलीवूडमध्ये अनेक राजकीय नेत्यांवर आधारित बायोपिक येऊन गेले किंवा येणार आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित ठाकरे, त्यानंतर माजी पतंप्रधान मनमोहन सिंह यांच्या आधारित ‘द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे चित्रपट प्रदर्शित झाले असून नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित पीएम मोदी तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा माय नेम इज रागा हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच त्यात आणखी एका नेत्याच्या बायोपिकची भर पडली आहे. ते आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. नुकताच त्यांच्या आयुष्यावर आधारित गडकरी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

अनुराग भुसारी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटाबाबत दिग्दर्शकांनी सांगितल्यानुसार या चित्रपटात वैयक्तिक आयुष्याचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नसून चित्रपटात फक्त त्यांचा राजकीय संघर्ष दाखवण्यात येणार आहे. बाल्यवस्थेपासून, त्यांच्या विद्यार्थीवस्था आणि त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात येणार आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 20 लोकांनी सहकार्य केले असून मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात चित्रपटाचे काम सुरु झाले. तब्बल सहा महिन्यांच्या संशोधनानंतर दोन महिन्यात चित्रपट तयार करण्यात आला. राहुल चोप्रा चित्रपटात नितीन गडकरीच्या भूमिकेत दिसणार आहे तर चित्रपट 5 मार्चच्या यूट्यूब रिलीज करण्यात येणार आहे.

Leave a Comment