पुलवामा हल्ल्यानंतर सौदीच्या प्रिन्सने टाळला पाकिस्तानचा दौरा

saudi-arebia
अबू धाबी : गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद जगभरात देखील उमटत असल्याचे दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याच दरम्यान सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे पाकिस्तानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांनी आपला दौर एकदिवसाच केला आहे. ते आज पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होते. पण ते आता उद्या दौऱ्यावर जाणार आहेत.

सौदीचे प्रिन्स पाकिस्तानच्या दोन दिवसांच्या नियोजित दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांनी काश्मीरमधील पुलवामात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आपला आजचा दौरा पुढे ढकलला. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 45 जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने हा आत्मघाती हल्ला केला. दुसरीकडे अद्याप या भेटीबाबत खुलासा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेला नाही. पाकिस्तानातील दैनिक डॉनच्या वृत्तामध्ये, दोन्ही देशांतील द्विपक्षीय मुलाखत पहिल्यासारखी व्यवस्थित पार पडणार असल्याचे म्हटले आहे.