
बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर दबंग भाई जान सलमान खानचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. सलमानने इंस्टाग्रामवर शेअर केलेली प्रत्येकच पोस्ट त्याचे चाहते अक्षरशःडोक्यावर घेतात. इतकेच नव्हे तर त्याच्या पोस्ट साठी चाहते आतुरतेने इन्स्टाग्राम स्क्रोलकरत असतात. आगामी भारत या चित्रपटासाठी सलमान मेहनत घेत बराच वेळ जिममध्ये घालवत असतो.
सलमानच ‘रिअल स्ट्रॉंग’
भाईजानने नुकताच त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला असून त्याला बिंग रिअलस्ट्रॉंग असे कॅप्शन दिले, पाहता पाहता फोटोला ८ लाखाहून जास्त लाईक्स मिळाले. याफोटोत सलमान खान नेहमीपेक्षा आधी स्मार्ट व डॅशिंग दिसतोय यात शंकाच नाही. सलमान त्याच्या फिज़िक वर विशेष लक्ष देतो हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. शिवाय सलमानचे ‘ जिम’ प्रेम देखील जगजाहीर आहे. बॉलिवूडचा भाई जान मम्माजबॉय आहे हे देखील तितकेच खरे आहे. आईच्याच सांगण्यावरून सिक्स पॅक ऍब्स बनवणार असून हा नवीन वर्षाचा संकल्प असल्याचे सलमानने सांगितले.
