घरच्या घरी बनी हैदराबादी चिकन दम बिर्याणी

biryani
शनिवार व रविवार हे दोन दिवस असे असतात, जेव्हा सर्व घरातील सर्व सदस्य उपस्थित असतात. अशावेळी काही तरी वेगळे जेवण बनवण्याचा बेत तर नक्कीच बनतो. बाहेरील खाद्यपदार्थापेक्षा कधीही घरी बनवलेले खाणे कधीही चांगलेच असते. ज्याची चव आपल्या जिभेवर कायम रेंगाळत असते. आज आम्ही आपल्यासाठी चिकन दम बिर्याणीची रेसिपी घेऊन आलो आहोत.

साहित्य: चिकन: 500g (मोठ्या तुकडा), बासमती तांदूळ: 250 ग्रॅम, दही : 250 ग्रॅम, कांदा: 3, आले-लसूण पेस्ट: 3 चमचे, हिरव्या मिरची: 5-6, पुदीना : 1/2 कप, कोथिंबीर : 1 कप, लोणी : 4 चमचे, तेल : तेल तळण्यासाठी, शाही बिर्याणी मसाला: 3 चमचे, हळद : 1/2 चमचे, लाल तिखट : 1 चमचा, फुड कलर : 1 छोटा चमचा, केशर : 1 चमचा, मीठ: चवीनुसार, पीठ: 250 ग्रॅम (झाकण्यासाठी), गरम मसाला – लवंगा, दालचिनी, छोटी वेलची, मोठी वेलची, जावित्री : 2-2 तुकडे.
biryani1
कृति : प्रथम चिकन चांगले धुवा आणि मोठ्या भांड्यात ठेवा. त्यात दही, लाल तिखट, हळद, शाही बिरयानी मसाला, आले लसूण पेस्ट आणि मीठ घालावे. नंतर त्यात हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पुदीना घाला. काही कोथिंबीर आणि पुदीना बाजूला ठेवा, नंतर त्यांचा गार्निशिंगमध्ये वापर करता येईल.
biryani2
नंतर गरम मसाला थोडासा कुटून त्यात घाला. त्यानंतर हे मिश्रण आणि चिकन चांगल्या प्रकारे एकजीव करुन घ्या आणि 10-15 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. त्यादरम्यान कांदा चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्या. त्याचबरोबर तांदुळ शिजवण्यासाठी पाणी गरम करुन घ्या आणि त्यात तांदुळ चांगला धुवून टाका. त्याआधी त्यात थोडे बटर आणि गरम मसालेदेखील टाका. तांदुळ पुर्णपणे शिजवू नका. तांदुळ अर्धा शिजल्यानंतर त्यातुन गरम मसाले आणि पाणी चाळून तांदुळ त्यातून वेगळा काढून घ्या.
biryani3
10-15 मिनिटे झाल्यानंतर चिकन फ्रिजमधून काढून ते एका भांड्यात घ्या. त्यात एक चमचा बटर टाका. नंतर त्यात तळलेला कांदा, धणे आणि पुदीना घालावा. त्यानंतर तांदळाचा एक थर लावून घ्या. लक्षात ठेवा दम बिर्याणी बनवण्यासाठी सर्व तांदुळ एकाच वेळी वापरायचा नाही. त्यानंतर पुन्हा मसाल्याचा थर आणि तांदळाचा थर असे आपले मिश्रण जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत करावे.
biryani4
या वरच्या भातामध्ये केसर ठेवून घ्या. आपण त्यात खाद्य रंग देखील वापरू शकता. पुन्हा एकदा कांदे, धणे आणि पुदीना घालावे आणि एक चमचा बटर टाकावे. आता त्यावर झाकण ठेवा आणि भांड्याच्या झाकणाला पीठालावून 20 मिनिटांपर्यंत मध्यम गॅसवर शिजेपर्यंत शिजवून घेणे. गॅस बंद केल्यानंतर चाकूच्या मदतीने पीठ काढून झाकण बाजूला करावे. आता तयार झाली आहे तुमची लजीज चिकन दम बिर्याणी. तिला तुम्ही कांदा, लिंबू आणि चटणीसह वाढू शकता.

Leave a Comment