निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्रा यांची नियुक्ती

sushil-chandra
नवी दिल्ली – कायदा मंत्रालयाने नुकतीच निवडणूक आयोगाच्या नव्या आयुक्तांची घोषणा केली असून त्यानुसार निवडणूक आयुक्त म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांची नियुक्ती केली असून या संदर्भातील अधिसूचना देखील जारी केली आहे. 1980 बॅचच्या भारतीय महसूल सेवेचे (आयआरएस) ते अधिकारी आहेत.

तत्कालीन निवडणुक आयुक्त सुनील अरोरा हे माजी निवडणुक आयुक्त ओ. पी. रावत यांच्या निवृत्तीनंतर मुख्य निवडणुक आयुक्त बनल्यानंतर आयोगामध्ये निवडणुक आयुक्ताचे पद खाली होते. मुख्य निवडणूक आयुक्ताव्यतिरिक्त आणखी दोन निवडणूक आयुक्त निवडणुक आयोगामध्ये असतात. सुशील चंद्रा यांच्या व्यतिरिक्त आता अशोक लवासा हे एक निवडणूक आयुक्त आहेत. चंद्रा आजपासून त्यांच्या कामकाजाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

Leave a Comment