’83’ मध्ये ‘हा’ अभिनेता होणार गावसकर

tahir-bhasin
1983मध्ये भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजला धुळ चारुन पहिला विश्वचषक जिंकला होता. आता तोच थरार नव्या पीढीला मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. कारण 1983साली जिंकलेल्या विश्वचषकावर आधारित 83 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रणवीर सिंह या चित्रपटात कपिल देव यांच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर या चित्रपटात लिटील मास्टर सुनील गावसकर यांची भूमिका कोण साकारणार आहे यावरुन पडदा आता हटविण्यात आला आहे. या चित्रपटात ताहीर राज भसीन हा सुनील गावसकर यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

गावसकरांची आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी ताहिर सध्या गावसकरांचे मार्गदर्शन घेत आहे. ताहीरने मर्दानी चित्रपटात साकारलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याच्या चित्रपटातील भूमिकेचे खुपच कौतुक केले गेले. त्याचबरोबर त्याने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मंटो आणि जॉन अब्राहमच्या फोर्स -2 मध्येही मध्यवर्ती भूमिका साकारली होती.


या चित्रपटातील एका फोटोही रणवीरने शेअर केला होता. पंजाबी अभिनेता ऐमी विर्क, तमिळ अभिनेता जिवा, अभिनेता सनी कौशल, ताहीर राज भसीन, हार्डी संधू आणि पंकज त्रिपाठी हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान हे करत आहेत.

Leave a Comment