निवडणुक धुमाळीत बाजारात आल्या मोदी साड्या

modi-sadi
गुजरात हा बनिया लोकांचा प्रांत आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. या लोकांना व्यवसायाची खास नॅक असते आणि कोणत्याही परिस्थितीचा ते व्यवसायासाठी उपयोग करून घेतात. याची प्रचीती सुरत मधील एका साडी व्यापाऱ्याने दिली आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या व्यापाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांची छबी छापलेल्या साड्या बाजारात आणल्या असून त्याला महिला वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

विशेष म्हणजे या साड्यांचा कपडा उत्तम आहे आणि त्यावर मोदी यांचे फोटो डिजिटल प्रिंटने छापले गेले आहेत. यात ३ ते चार व्हरायटी आहेत. या साड्यांची महिलांमध्ये क्रेझ असून खरेदीसाठी त्या गर्दी करत आहेत. ग्राहक महिलांच्या मते मोदी गुजराथचा गौरव आणि देशाची शान आहेत. त्यांचा चेहरा प्रिंट केलेली साडी नेसणे हे आमच्यासाठी गौरवाचे आणि अभिमानाचे आहे.

विशेष म्हणजे गुजरात बाजारात आणखी ५-७ दिवसात प्रियांका गांधी यांची छबी छापलेल्या साड्याही दाखल होत आहेत असे या व्यापाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment