फायरब्रँड सुषमा स्वराज यांच्यासाठी १४ फेब्रुवारीचे असेही महत्व

sushama
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या आयुष्यात १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेनटाइन डे चे एक खास वेगळे महत्व आहे. राजकारणात फायरब्रँड अशी ओळख असलेल्या सुषमा स्वराज यांचा हा जन्मदिवस आहे. आणि महत्वाचे म्हणजे हरियानाच्या या कन्येने त्या काळात केलेला प्रेमविवाह. त्या काळात हरियानात मुलीने कुणा तरुणावर प्रेम करणे हा विचारही साहसी मनाला जायचा त्या काळात सुषमा स्वराज यांनी घराचा विरोध असतानाही स्वराज कौशल याच्याबरोबर प्रेमविवाह केला.

सुषमा जबरदस्त, बेधडक आहेत तितक्याच एक व्यक्ती म्हणून त्या मोठ्या आहेत. १४ फेब्रुवारी १९५२ हा त्यांचा जन्मदिवस. हरियानातील अंबाला हि त्यांची जन्मभूमी. स्वराज कौशल यांच्याशी त्यांची ओळख झाली ती कायदा महाविद्यालायात शिकत असताना. ही ओळख पुढे प्रेमात बदलली आणि दोन्ही घरून विरोध असतानाही अनेक तणाव, अडचणी सोसून त्यांनी प्रेमविवाह केला. वयाच्या २५ व्या वर्षीच त्या हरियाणाच्या कॅबिनेट मंत्री होत्या. त्या ही सुप्रीम कोर्टात वकिली करत होत्या.

swaraj
सुषमा यांचे पती स्वराज कौशल हे सुप्रीम कोर्टातील प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर. वयाच्या ३४ व्या वर्षीच ते देशाचे युवा अॅडव्होकेट जनरल बनले आणि ३७ व्या वर्षी मिझोरमचे गव्हर्नर. या जोडप्याला बासुरी नावाची एक कन्या असून तीही वकील आहे. सुषमा यांना अनेक भाषा अवगत आहेत. यंदाच त्यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले असून त्यावर त्यांच्या पतीची प्रतिक्रिया फार बोलकी होती. स्वराज कौशल म्हणाले, गेली ४१ वर्षे राजकारण करत आहात, ११ निवडणुका लढवून झाल्या. गेली ४६ वर्षे मी तुमच्या मागे फिरतो आहे. आता मी १९ वर्षाचा नाही. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढविणार नाही याबद्दल मॅडम, थँक यु.

Leave a Comment