मित्सुबिशीची डी ५ टेरेन कँपर व्हॅन लाँच

teren
जपानी ऑटो कंपनी मित्सुबिशीने डी ५ टेरेन या नावाने स्वस्त कँपर व्हॅन बाजारात आणली असून तिची जपान मधील किंमत २५ लाख आहे. ही कँपर व्हॅन भारतात ८० लाख रुपयात मिळेल असे सांगितले जात आहे. या कँपर व्हॅनचा वापर वाहन म्हणून तसेच गरजेनुसार स्वयंपाक आणि आराम असाही करता येणार आहे.

या कँपर व्हॅनला २४०० सीसीचे पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. सामान्य रस्त्यावर हे इंजिन फक्त फ्रंट व्हीलला पॉवर देते तर पहाडी आणि दुर्गम भागात फोर व्हील ड्राईव्ह मध्ये बदलता येते. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार सस्पेन्शन लिफ्ट व रुफ आशय सुविधा लावू शकतो.

या कँपर व्हॅनची मागची सीट बेड मध्ये बदलता येते. यात किचन आणि फ्रीज दिला गेला असून एक टेबल आहे त्याचा वापर खाणे आणि झोपणे या दोन्हीसाठी करता येतो.

Leave a Comment