नॉनव्हेज खातात म्हणून लग्नात बोलविले नाही आई- वडीलांना !

wedding

घरात लग्न असल्यावर आपण सर्व नातेवाईक आणि जवळच्या पाहुण्यांना निमंत्रण देतो. मात्र एका लग्नात चक्क नवरीने आपल्याच आई- वडील आणि नातेवाईकांना बोलविले नाही. याची माहिती नववधुने चक्क  आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे.

non-veg-dishes

ही महिला शाकाहारी आहे, मात्र तिचे कुटुंब आणि सासरकडील नातेवाईक मांसाहारी आहेत. या महिलेने तिच्या लग्नात मांस  खाणाऱ्यांना आमंत्रित केले नाही. ती म्हणाली की, मला आणि माझ्या पतीला वाटते की आमच्या लग्नात मांसाहारी करणारे सामील होऊ नयेत. या महिलेने वॅगन रेव्होल्यूशन नावाच्या फेसबुक पेजवरुन या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे.

या महिलेने सांगितले की, माझ्या या निर्णयामुळे लोक मला असभ्य म्हणाले तर मला कोणताही फरक पडत नाही.  कारण, मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करू शकत नाही. मी त्या लोकांना दोन वर्षांपर्यंत शिक्षित करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही परिणाम झाला नाहीत. म्हणूनच मी त्यांना माझ्या लग्नाला बोलू इच्छित नाही, कारण तेथे कोणत्याही अडचण निर्माण होऊ नये असे मला वाटते.

हे लोक मला आणि माझा पतीला शाकाहारी असल्यामुळे नेहमीच बोलत आलेले आहेत. आणि याच लोकांना आता माझ्या लग्नाला याच आहे. जेव्हा मी माझ्या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा त्या लोकांनी माझ्याविषयी बोलायला सुरुवात केली.  कारण मी त्या लोकांना माझ्या लग्नासाठी निमंत्रण दिले नव्हते.

Leave a Comment