अमेरिकेत आढळला तृतीयपंथी पक्षी

cardinal
जगभरात शेकडो जातीचे पक्षी आहेत. त्यांची एक वेगळीच दुनिया आहे असे म्हटले तरी ते गैर होणार नाही. मात्र आत्तापर्यंत पक्षी गणात नर आणि मादी असेच दोन विभाग होते. अमेरिकेत पेनसिल्वानिया येथे मात्र अर्धा नर आणि अर्धी मादी असा अद्भुत पक्षी नुकताच आढळला आहे. त्यामुळे पक्षी प्रेमी आणि तज्ञ हैराण झाले आहेत.

bird
नॅशनल जिओग्राफिक मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार हा पक्षी एरी शहरात काही आठवड्यापूर्वी आढळला. तो अर्धा केशरी लाल आणि अर्धा फिकट भुरक्या रंगाचा असून कार्डियल जातीचा आहे. जेफ्री आणि शिरले काल्डवेल नावाचे जोडपे गेली २५ वर्षे घराच्या अंगणात पक्षांना दाणा पाणी देण्याचे काम करते आहे. त्यामुळे त्यांना अनेक पक्षी पाहण्याची संधी मिळते. अशाच एका सकाळी त्यांना मधोमध दोन रंगात विभागाला गेलेला कार्डीयल पक्षी दिसला. या जातीच्या पक्ष्यांमध्ये नर लालसर रंगाचा असतो तर मादी भुरकट रंगाची असते. हा पक्षी दोन्ही रंगात अर्धा अर्धा असल्याने त्याला तृतीयपंथी ठरविले गेले आहे. असा पक्षी प्रथमच पाहिला गेला आहे.

Leave a Comment