
सलमान खान आणि कतरिना कैफच्या टायगर जिंदा है या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर ही जोडी पुन्हा तुमचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे. ही जोडी भारत या आगामी चित्रपटात झळकणार आहे. मागच्या महिन्यातच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद भेटला होता. आता या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची माहिती मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिली आहे.
सलमान आणि कतरिनाचा ‘भारत’ हिंदीबरोबरच अन्य तीन भाषेत होणार रिलीज
त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार हिंदीसोबतच, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत सलमान खानचा भारत हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट निर्मात्यांना मर्यादित प्रेक्षकांसाठी सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारतातील अन्य भाषांमध्ये सुद्धा त्यांना हा चित्रपट रिलीज करायचा आहे. सध्या चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग सुरु आहे, पुढच्या आठवड्यात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये जुन्या दिल्लीचा सेट लावण्यात आला आहे.
