सौदी अरेबियाची पाकिस्तानला 10 बिलियन डॉलर पेक्षा अधिकची मदत

saudi-arebia
इस्लामाबाद : पाकिस्तान सध्याच्या घडीला आर्थिक मंदीतून जात असून आता पाकिस्तानच्या मदतीला सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान धावून आले आहेत. त्यातच प्रिन्स पहिल्यांदाच पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण तत्पूर्वी पाकिस्तानला सढळ हातांनी भरघोस आर्थिक मदत केली आहे. सौदी अरेबियाने 10 बिलियन डॉलर पेक्षा अधिक रक्कम देऊ केली आहे. आता ती जर अंकात सांगायची झाली तर ती अंदाजे 7,09,15,00,00,000 रुपये एवढी होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निमंत्रणावर सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान 16 फेब्रुवारीला पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. पाकिस्तानचे प्रिन्स सलमान हे पहिले पाहुणे आहेत. ते या दौऱ्यात दोन देशांमधील मोठ्या तीन प्रमुख करारांवर स्वाक्षरी करतील, अशी माहिती संचालक मंडळाचे अध्यक्ष (बीओआय) हारून शरीफ यांनी दिली. तेल शुद्धीकरण, लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) आणि खनिज विकासक क्षेत्रातील हे करार असतील.

पाकिस्तानसोबत या करार व्यतिरिक्तव्यापाराबाबत अनेक करार होणार आहेत. प्रिन्स सौदीमधील 40 टॉप उद्योगतीसोबत पाकिस्तानला भेट देत आहेत. सौदी अरेबिया दरम्यान अनेक व्यापार करार समावेश असू शकतो. हे प्रतिनिधी स्थानिक व्यावसायिकांची भेट घेतील. त्यांच्याशी चर्चा करतील. या भेटीदरम्यान काही खासगी पातळीवरील करारदेखील असतील. तेल रिफायनरीबाबत 8 बिलियन डॉलरची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीव्यतिरिक्त स्थानिक लोक रोजगाराच्या संधी देखील प्रदान करतील. तसेच सौदी रिफायनरीसह पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक अबरो डॉलरची अतिरिक्त गुंतवणूक होईल.

Leave a Comment