याच महिन्यात लाँच होणार सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन?

samsung
मुंबई : स्मार्टफोन बाजारपेठेत अग्रेसर असलेल्या कोरियन कंपनी सॅमसंगचा गॅलेक्सी एस 10 हा स्मार्टफोन याच महिन्याच्या 20 तारखेला सॅन फ्रान्सिस्कोमध्ये लाँच करण्यात येणार आहे.

याबाबत इतर प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या फोनसोबत कंपनी आपला बहुप्रतिक्षित फोल्डेबल स्मार्टफोन देखील सादर करु शकते. स्मार्टफोन प्रेमी 2019 मध्ये टेक्नोलॉजीच्या जगात आता 5 जीबरोबर फोल्डेबल स्मार्टफोनची वाट पाहत आहेत. याबाबत कंपनीने एक टीझर रिलीज केला आहे. ज्याच्या आधारे अशी आशा व्यक्त केली जात आहे. सॅमसंगने या डिव्हाइसबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही. पण असे म्हटले जाते की त्या दिवशी सॅमसंग गॅलेक्सी एस 10 सह गॅलक्सी एफ किंवा गॅलेक्सी फ्लेक्स देखील लॉन्च करेल.

फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या सॅमसंग डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये कोरियन कंपनीने जाहीर केली होती. त्यानुसार कंपनीचे लक्ष्य आहे की, किमान एक दशलक्ष फोल्डेबल स्मार्टफोन विक्रीचे आहे. कंपनी त्यानंतर बाजारातील स्थिती पाहून फोल्डेबल फोन उत्पादन वाढवू शकते.

4400 एमएएच बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली आहे. फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोनमध्ये फोनमध्ये दोन बॅटरी असून शकतात. यात 2200 एमएएच दोन असतील. पूर्वी असे म्हटले होते की 6200 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. या फोनमध्ये दोन डिस्प्ले असतील. प्राथमिक 7.3 इंच आहे आणि दुय्यम 4.58 इंचाचा आहे. गेल्या वर्षी जेव्हा हा फोन डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात आला. तेव्हा त्यावेळी कंपनीने सांगितले की वापरकर्ते एकाच वेळी तीन अॅप्स प्राथमिक स्क्रीनवर वापरण्यास सक्षम असतील. त्यासाठी कंपनीने मल्टी-अॅक्टिव्ह विंडो असे फीचर्ससाठी नाव दिले आहे. सॅमसंग कंपनीने हा फोल्ड होणारा स्मार्टफोन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात उतरवत आहे. या फोल्डएबल स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर, 10 जीबी रॅम असू शकेल.

Leave a Comment