राज ठाकरेंची ‘मनसे’ भेट घेणार अजित पवार

combo
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आघाडीत येण्याचे आवाहन केल्यानंतर ते आता त्यांची वैयक्तिक भेट घेणार असून ही गुप्त बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती आहे. या बैठकी दरम्यान दोघांमध्ये लोकसभा जागावाटपा वरुन चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथील जागांसाठी आग्रही असल्याची माहिती यापूर्वीच समोर आली होती.

दरम्यान काल अजित पवार यांनी मतांचे होणारे विभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे की एकत्र आले पाहिजे, असे म्हटले होते. जर मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत आली तर आघाडीची ताकद आणखी मजबूत होणार हे निश्चित आहे.

Leave a Comment