
मराठी सिनेसृष्टीतील हॉट आणि ग्लॅमर अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या सई ताम्हणकरने एक महत्वपुर्ण घेतला आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसमोर मांडणारी सई आता सोशल मीडियापासून पूर्णपणे अलिप्त राहणार आहे.
सई ताम्हणकरचा चाहत्यांना धक्का देणार निर्णय!
याबाबत सई सांगते की, मी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते आणि माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला मला खुप आवडतो. पण सध्या कामा निमित्त वाढलेल्या धावपळीमुळे मी काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे मी स्वतःला वेळ देऊ शकते, त्यातुनच मला स्वतःमध्ये काही चांगले बदल घडवून आणायचे असल्यामुळे हा महत्वपूर्ण निर्णय मी घेतला आहे.
सई ताम्हणकरचे इन्स्टाग्रामवर सा़डेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्विटरवर 79 हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्याचबरोबर फेसबुकवर १० लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अशावेळेस सई अचानक सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्याचे ठरवले आहे.
