विद्यार्थ्याने बनविले जगातील सर्वात मोठे घड्याळ  

clock

आपण महागड्या ब्रँडचे घड्याळ बघितले असेल आणि वापरत देखील असाल. मात्र वरील चित्रात हे घड्याळ अनोखे आहे. हे जगातील सर्वात मोठे घड्याळ आहे.  हे घड्याळ एका विद्यार्थ्याने बनवले असून याची चर्चा सर्वत्र होत आहे.

आगरा येथील दयालबाग शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्या संपन्न सक्सेना याने 67 इंचाचे घड्याळ बनवले आहे. संपन्नने असा दावा केला आहे की, हे जगातील सर्वात मोठे घड्याळ आहे. यापूर्वी 57-इंचाचे घड्याळ बनविण्यात आला होते. या घड्याळाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली होती. संपन्नचा दावा आहे की , त्याने लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मोडला आहे. शिकोहाबादमध्ये राहणारे संपन्न म्हणतात की, मला घड्याळ बनविण्याची प्रेरणा वडिलांपासुन मिळाली.

हे घड्याळ तयार करण्यासाठी 45 दिवस लागले. तिरंग्याच्या रंगातील हे  घड्याळ खूप सुंदर दिसत आहे. घड्याळाचा व्यास 5 फुट सात इंच आहे. या घड्याळाची खासियत अशी आहे की हे घड्याळ 15 मिनिटांमध्ये फोल्ड करुन कुठेही घेऊन जाऊ शकता.