अक्षय कुमारच्या ‘केसरी’चा टीझर तुमच्या भेटीला

keasri
बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेला अक्षय कुमार लवकरच आपला आगामी केसरी हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सिनरसिकांमध्ये होत आहे. आता नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

हा टीझर अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून त्याखाली त्याने अविश्वसनीय सत्य कथा असे कॅप्शन दिले आहे. युद्धासाठी सज्ज असलेल्या सैन्याचा जोश या टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.


२१ शीख सैनिकांवर १२२ वर्षांपूर्वी सुमारे १० हजार अफगाणांनी हल्ला केला. यावेळी शिखांनी हार पत्करण्यापेक्षा लढून मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला त्यावर आधारित ‘केसरी’ हा चित्रपट आहे. हा चित्रपट २१ मार्चला रिलीज होणार आहे.