आता धार्मिक कार्ये करण्यासाठी पुजाऱ्यांनाही मिळत आहे मासिक वेतन

religous
आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने होम-हवन, इतर धार्मिक कार्ये कधी ना कधी होतच असतात. या कार्यांसाठी पुजाऱ्यांना किंवा गृरुजींना बोलावून त्यांच्या करवी ही कार्ये संपन्न केली जातात. त्यानंतर गुरुजींना यथायोग्य दक्षिणाही दिली जाते. मात्र आतापासून धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिद्वारेमध्ये मात्र पुजारी यजमानांच्या घरी धार्मिक कार्ये करण्यासाठी मासिक वेतन घेताना पहावयास मिळत आहेत. सध्या हरिद्वारमध्ये ही नवी पद्धत चलनात असून अतिशय झपाट्याने लोकप्रिय ही होत आहे.
religous1
या नव्या पद्धतीनुसार पंडित महाराजांचे मासिक वेतन यजमानांच्या द्वारे निश्चित केले जात असून, या मासिक वेतनाच्या बदल्यात पंडित महाराजांनी यजमानांच्या घराची सर्व धार्मिक कार्ये पार पाडायची आहेत. यामध्ये यजमानांना ज्याप्रमाणे आवश्यकता असेल त्याप्रमाणे नित्याच्या पूजेपासून, ते महिन्यातून एकदा केल्या जाणाऱ्या होमापर्यंत सर्व धार्मिक कार्ये पंडित महाराजांनी करावयाची असून, त्यानुसार मासिक वेतन घ्यायचे आहे. हे मासिक शुल्क यजमानांची आर्थिक स्थिती आणि महिन्यामध्ये करावयाची एकूण धार्मिक कार्ये यांवर अवलंबून असल्याचे समजते. पुजारी मंडळींसोबत यजमान मंडळींमध्ये ही नवी पद्धत लोकप्रिय होताना दिसत आहे.
religous2
महिन्याभराच्या धार्मिक कार्यांसाठी पुजारी दरमहा अकराशे रुपये घेत असून, व्यावसायिक प्रतिष्ठानांकडून एकवीसशे रुपये आकरतात. या वेतनामध्ये पुजारी यजमानांच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी दररोज किंवा आठवड्यातून एकदा पूजा करतात. या पूजेदरम्यान देवाची आरती आणि इतर मंत्रांचे उच्चारणही केले जाते.

Leave a Comment