ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकण्यासाठी घेतली ‘पंटर’ची मदत

ricky-ponting
सिडनी – इंग्लंडमध्ये मे-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून माजी कर्णधार रिकी पाँटिंगला नियुक्त करण्यात आले आहे. त्याच्यावर संघाची फलंदाजी मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक डेविड साकेर यांच्या जागेवर ५ विश्वचषक खेळून ३ विश्वचषक जिंकून देणाऱ्या पाँटिंगची नियुक्ती झाली आहे. नुकताच साकेर यांनी राजीनामा दिला होता.

याबाबत बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीए म्हणाले, की फलंदाजीवर रिकी लक्ष केंद्रित करेल तर सध्याचे ग्रीम हिक अॅशेजच्या तयारीत व्यस्त आहेत. मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर म्हणाला की, केवळ फलंदाजांचा मार्गदर्शक नसून संपूर्ण संघाचा मार्गदर्शक रिकी आहे. आम्ही सर्वजण विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्न करु. यावेळी संघाने काय करायला पाहिजे हे रिकीला चांगले माहित आहे.

ऑस्ट्रेलियाने पाँटिंगच्या नेतृत्वाखाली २००३ आणि २००७ मध्ये २ वेळा विश्वचषक जिंकला आहे. त्याने ३७५ एकदिवसीय आणि १६८ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. भारत आणि पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेनंतर तो ही जबाबदारी सांभाळेल.

Leave a Comment