कोलकाता पोलिसांची सीबीआयच्या माजी हंगामी संचालकांच्या मालमत्तेवर मालमत्तेवर धाड

nageshwar-rao
कोलकाता – मागील आठवड्यातल्या रविवारी कोलकाता पोलीस आयुक्तांच्या घरावर सीबीआयच्या पथकाने अचानक धाड टाकल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्याच्या घरावर कोलकाता पोलिसांनीच छापा मारला आहे. कोलकात्ता पोलिसांनी सीबीआयचे माजी हंगामी संचालक नागेश्वर राव यांच्या २ विविध ठिकाणांच्या मालमत्तेवर धाड टाकल्यामुळे केंद्राच्या अॅक्शननंतर ममतांनी जोरदार रिअॅक्शन दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सीबीआय विरुद्ध ममता हे प्रकरण मागील आठवड्यापासून देशभरात गाजत आहे. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआयच्या या कारवाईला सडेतोड उत्तर देण्याचा विचार केल्याचे चित्र सध्या कोलकात्यात दिसत आहे. या कारवाईची माहिती कोलकाता पोलिसांनी केलेल्या कारवाईपूर्वी पत्रकार परिषदेतून दिली होती. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी नागेश्वर राव यांच्या पत्नीच्या एका कंपनी कार्यालयावर एक धाड टाकली आहे. तर छापेमारीची दुसरी कारवाई राव यांच्या कोलकात्यातील घरावर टाकली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची शारदा आणि रोज व्हॅली चिटफंड प्रकरणावरुन सीबीआय चौकशी होणार आहे. त्यासाठी ते शिलाँगच्या सीबीआय कार्यालयात दाखल झाले. राजीव कुमार कार्यालयात पोहोचल्यानंतर काही वेळात कोलकाता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार यांना अटक न करता चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Leave a Comment