तामिळनाडू संघाचे नेतृत्व करणार आर.अश्विन

ashwin
मुंबई – मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत तामिळनाडू संघाचे भारतीय कसोटी संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन नेतृत्व करणार आहे. २१ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ही मालिका होणार आहे. नुकतीच या संघाची घोषणा करण्यात आली. पण त्या संघात मुरली विजयला स्थान देण्यात आले नाही. त्याचा पत्ता खराब फॉर्ममुळे कट करण्यात आला आहे.

संघात युवा अष्टपैलू खेळाडू वाशिंग्टन सुंदरचे पुनरागमन झाले असून त्याच्यावर संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय टी-२० संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या विजय शंकरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षी सैयद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना दिल्ली आणि राजस्थान यांच्यात झाला होता. ज्यात दिल्लीने राजस्थानच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करत चषकावर नाव कोरले होते.

तमिळनाडूचा संघ – आर. अश्विन (कर्णधार), वाशिंग्टन सुंदर, एन जगदीशन, सी. हरी निशांत, एम. शाहरूख खान, बी. इंद्रजीत, आर. विवेक, टी नटराजन, एम मोहम्मद, जे कौशिक, आर साइ किशोर, एम अश्विन, एनएस चतुर्वेद, विजय शंकर, वीए डेविडसन आणि अभिषेक तंवर.

Leave a Comment