‘डोंबिवली रिटर्न’चा ट्रेलर लाँच

sandeep-kulkarni
ख्यातनाम वादक तौफिक कुरेशींच्या हस्ते मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता संदीप कुलकर्णी ‘डोंबिवली रिटर्न’ चित्रपटाचा ट्रेलर आणि म्यूझिक लाँच करण्यात आले.

एका मध्यमवर्गीय व्यक्तीची कथा ‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. भरपूर पैसे कमावण्याची संधी नाकासमोर चालणाऱ्या या व्यक्तीला अचानक चालून येते. त्याचे आयुष्य त्यानंतर कसे बदलते, ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तसेच दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. संदिप कुलकर्णी, राजेश्वरी सचदेव, ऋषिकेश जोशी, सुनील जोशी, सिया पाटील यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे संदीपने सिने निर्मितीतही पाऊल टाकले आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार विजेता संगीतकार शैलेंद्र बर्वेने संगीत दिले आहे. प्रसेनजीत कोसम्बी, सोनू कक्कर, प्रदीप कुंवर यांनी या चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज चढवला आहे.

मराठी माणसाच्या मनात ‘डोंबिवली फास्ट’ने जशी एकच खळबळ उडवून दिली होती, तशीच खळबळ ‘डोंबिवली रिटर्न’च्या माध्यमातून संदीप कुलकर्णी उडवून देण्यात यशस्वी होणार का हे पाहणे रंजक ठरेल. हा चित्रपट येत्या २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment