अॅपलमधील 1.73 अब्ज पगाराची नोकरी सोडणार अँजेला अँरेंट्स

angela-ahrendts
गेल्या काहीदिवसांपासून अॅपलच्या आयफोन विक्रीत घट होत असल्यामुळे कंपनीतील सर्वात जास्त पगार असणारे अधिकारी कंपनी सोडून जात आहेत. विशेष म्हणजे जास्त पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांमधील रिटेल प्रमुख अँजेला अँरेंट्सही (angela ahrendts) आता कंपनी सोडणार आहे. एप्रिल महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा अँजेला देणार आहे.

2014 मध्ये अँजेला यांनी अॅपल कंपनी जॉईन केली होती. अंदाजे 1.73 अब्ज रुपये तिचा पगार होता. अँजेला अँरेंट्स नोकरी का सोडत आहे? हे कारण अजून स्पष्ट नाही. पण आता कंपनीने अँजेलाच्या जागेवर उपाध्यक्ष डिरड्रे ओ ब्रायनची नियुक्ती केली आहे. गेले तीस वर्ष ब्रायन कंपनीमध्ये काम करत आहे. 2015 च्या फोर्ब्सच्या यादीत अँजेला जगातील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून 25 व्या स्थानावर होती.

आर्थिक वर्ष 2019च्या पहिल्या तीन महिन्यामध्ये अॅपलने 84.3 अब्ज डॉलर रुपयांची विक्री केली. गेल्या वर्षीच्या तुलनेने ही विक्री 5 टक्क्यांनी कमी आहे. आयफोनला मिळालेल्या नफ्यांमध्ये 15 टक्क्यांची घट झाली आहे. मिळालेल्या नफ्यामध्ये आंतरराष्ट्रीय विक्रीचे योगदान 62 टक्के आहे. यावेळी पहिल्यांदाच कंपनीने विक्रीबद्दलची माहिती दिलेली नाही.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या आयफोनच्या उत्पादनात 10 टक्क्यांची घट झाली आहे. तसेच अॅपलने आपले उत्पादन कमी करण्यास सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. आयफोनने डिव्हाईसच्या नियोजित उत्पादनातही घट केली आहे.

Leave a Comment