ज्योतिष परिषदेची भविष्यवाणी, देशाचे पंतप्रधान होतील नितीन गडकरी

nitin-gadkari
अमरावती – २०१९ च्या लोकसभा निवडणुका आता काही महिन्यावरच येऊन ठेपल्या असून पुन्हा भाजपच सत्तेवर येणार का? काँग्रेसची सत्ता येणार का? महाआघाडीचे काय होणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा देशातील प्रत्येक नागरिकां तसेच राजकीय नेत्यांमध्ये होत असतानाच नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी अमरावती येथील ज्योतिष परिषदेने वर्तवली आहे. ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे ही भविष्यवाणी ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी वर्तवली आहे.

भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमत मिळणार नसल्याचे भविष्य या परिषदेत वर्तवण्यात आले. मित्रपक्षांच्या सहकार्याने भाजपला सत्ता स्थापन करावी लागेल, असे झाल्यास नितीन गडकरींना पंतप्रधान म्हणून मिळेल अशी भविष्यवाणी या भविष्य परिषदेत वर्तवण्यात आली. गडकरी यांच्या ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे २०१९ मध्ये त्यांना सर्वात मोठी संधी असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. यावेळीही मुख्य लढाई काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच असणार आहे. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच ही लढाई असणार आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. अशात आता नितीन गडकरी पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी ज्योतिष परिषदेने वर्तवली आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीने दिले आहे.

Leave a Comment