सिंधूने चीनी कंपनीसोबत केला ५० कोटींचा करार

sindhupv
बॅडमिंटन मध्ये ऑलिम्पिक रजत पदक विजेती भारताची खेळाडू पीव्ही सिंधू हिने क्रीडा समान बनविणाऱ्या ली निंग या चीनी कंपनीसोबत चार वर्षासाठी ५० कोटींचा करार केला आहे. या कंपनीने गेल्या महिन्यात किदंबी श्रीकांत याच्यासोबाठी याच काळासाठी ३५ कोटींचा करार केला आहे.

ली निंगची भारतातील भागीदार कंपनी सनलाईट स्पोर्ट्स प्रा.लिमी चे अध्यक्ष महेंद्र कपूर म्हणाले, सिंधू सोबत केला गेलेला करार बॅडमिंटन दुनियेत मोठ्या करारात गणला जाईल. हा करार पुमाने टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली सोबत केलेल्या कराराच्या धर्तीवर आहे. या करारानुसार सिंधूला ४० कोटी स्पॉन्सरशिप आणि बाकी क्रीडा सामग्री या स्वरुपात मिळणार आहेत. रिओ ऑलिम्पिक मध्ये रजत पदक मिळविल्यानंतर सिंधूच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. फोर्ब्सने गेल्या वर्षी सर्वाधिक कमाईच्या खेळाडूंची यादी जाहीर केली त्यात सिंधू ७ व्या स्थानावर आहे.

Leave a Comment