
विवो येत्या २० तारखेला विवो व्ही १५ प्रो हा नवा स्मार्टफोन भारतात सादर करत असून त्याचा नवा टीझर व्हिडीओ नुकताच पोस्ट केला गेला आहे. या फोनला ३२ एमपीचा पॉपअप सेल्फी कॅमेरा दिला गेला असून जगातील या प्रकारचा हा पहिलाच फोन असल्यचा दावा कंपनीने केला आहे.
विवो व्ही १५ प्रोला ३२ एमपी पॉपअप सेल्फी कॅमेरा
व्हिडीओ मध्ये फोनची जी फिचर दिसत आहेत त्यानुसार या फोनच्या रिअरला ४८ एमपी, ८ एमपी आणि ५ एमपी असा ट्रिपल कॅमेरा सेटअप असून या कॅमेऱ्याना एआय सपोर्ट दिला गेला आहे. व्हिडीओ मध्ये फोनचा ब्रांड अम्बेसिडर आमीर खान हँडसेटचा वापर करताना दिसत आहे. कंपनीने गतवर्षी विवो नेक्स हा ८ एमपी पॉपअप सेल्फी कॅमेरा असलेला फोन जुलाई मध्ये बाजारात आणला होता.
विवो व्ही १५ प्रो हा फोन गीकबेंचवर लिस्ट केला गेला आहे. त्यानुसार त्याला अमोलेद पॅनल डिस्प्ले, अँड्राईड ९.० पाय ओएस, ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज अशी अन्य फिचर असतील.
