सानिया मिर्झाच्या आयुष्यावर बनतोय चित्रपट

pariniti
गेल्या वर्षात आणि यंदाही बॉलीवूड मध्ये अनेक सेलेब्रिटीच्या बायोपिक बनत असून त्यात आता भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा समावेश झाला आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना सानिया मिर्झा हिने तिची बायोपिक बनत असून या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्याचे जाहीर केले आहे. ती म्हणाली, रोनी स्क्रूवाला हा चित्रपट बनवीत आहेत. या संदर्भात अनके दिवस चर्चा सुरु होती.

सानिया ६ ग्रँड स्लॅम जिंकणारी एकमेव भारतीय टेनिस पटू आहे. तिने महिला डबल्स तीन आणि मिक्स डबल्स तीन अशी सहा ग्रँडस्लॅम जिंकली आहेत. तिची भूमिका परिणीती चोप्रा हिने साकारावी अशी इच्छा सानियाने पूर्वीच व्यक्त केली होती. सानिया म्हणाली, बायोपिक बनतेय याचा आनंद मोठा आहे आता फक्त चित्रपटाची प्रतीक्षा आहे. बाकी अभिनेत्यांच्या भूमिकांसाठी निवड सुरु आहे असेही तिने सांगितले.

यापूर्वी खेळाडूंच्या जीवनावर आलेल्या दंगल, भाग मिल्खा भाग, एमएस धोनी, मेरी कॉम या चित्रपटाना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Leave a Comment