बेड्या घातलेल्या जॉर्ज फर्नांडीसची मूर्ती होणार स्थापन

jorge
माजी संरक्षण मंत्री आणि समता पक्षाचे संस्थापक दिवंगत जॉर्ज फर्नांडीस याची हातात बेड्या असलेली मूर्ती मुझफ्फरनगर या त्यांच्या मतदारसंघात स्थापन केली जाईल अशी घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. फर्नांडीस याच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन जनता दल युनायटेडतर्फे पटना येथील रवींद्र सदन मध्ये केले गेले होते त्यावेळी नितीशकुमार बोलत होते.

नितीशकुमार म्हणाले, १९७७ मध्ये जॉर्ज फर्नाडीस यांना डायनामाईट प्रकरणी बेड्या घालून तुरुंगात टाकले गेले होते तेव्हा तुरुंगातूनच त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा बेड्या घातलेला फोटो खूपच चर्चेत होता. केवळ त्यांच्यामुळे मी आज बिहारचा मुख्यमंत्री बनू शकलो आणि राज्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली. जॉर्ज यांना बिहार बद्दल आस्था होती आणि बिहारसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. याचे विस्मरण आम्हाला कधीच होणार नाही.

Leave a Comment