रा गा ने मोदींवर येथे घेतली आघाडी

raga
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्याचबरोबर मोठ्या पडद्यांवर म्हणजे चित्रपट सृष्टीमध्येही बड्या राजकारणी नेत्यांवर चित्रपट तयार होत आहेत. पंतप्रधान मोदी याच्या नमो चित्रपटाचे शुटींग सुरु झाले असताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे मोदी यांना मागे टाकलेले दिसत आहे. राहुल गांधी याच्या जीवनावर तयार होत असलेला माय नेम इज रा गा –राहुल गांधी हा चित्रपट पूर्ण होत आला असून तो एप्रिल मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे समजते. पत्रकार आणि चित्रपट दिग्दर्शक रुपेश पॉल यांचा हा चित्रपट राहुल गांधी यांच्या बालपणापासून ते त्यांची कॉंग्रेस अध्यक्षपद निवड असा आवाका दाखवेल. या चित्रपटाचे टीझर जारी केले गेले आहे.

या चित्रपटाची सुरवात इंदिरा गांधी यांच्या हत्येपासून होणार आहे. सोनिया गांधी, प्रियांका, राजीव आणि राहुल यांच्या भूमिका यात असतील. रुपेश या चित्रपट संदर्भात म्हणाले, राहुल गांधी यांचा महिमा वाढविणे हा या चित्रपटाचा हेतू नाही. राहुल यांना मी जवळून पहिले आहे. एखाद्या व्यक्तीवर सतत चौफेर हल्ले केले जात असतील आणि ती व्यक्ती त्याला धीराने तोंड देऊन यशस्वी बनली असेल अश्या कुठल्याही व्यक्तीचा हा चित्रपट आहे. राहुल गांधी यांच्या वाट्याला हे सारे आले आहे तेच दाखविण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला गेला आहे.

हा चित्रपट बनविताना कुणाचीही परवानगी घेतली गेलेली नाही कारण यात जे चित्रित केले गेले आहे ते सार्वजनिक रित्या प्रसिद्ध झालेल्या मजकुराचा आधार घेऊन केले आहे. राहुल याची भूमिका अश्विन कुमार करणार आहेत. मोदींच्या भूमिकेत हेमंत कपाडिया तर मनमोहन सिंग याच्या भूमिकेत अनुपम खेर यांचे बंधू राजू खेर दिसणार आहेत.

Leave a Comment