एका अजब आजाराने त्रस्त आहे सोनू निगम

sonu-nigam
सध्या अजब आजाराने नेहमी चर्चेत असणारा गायक सोनू निगम त्रस्त झाला आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर त्याने एक फोटो शेअर केला असून त्यात त्याचा एक डोळा सूजलेला दिसत आहे.

एका फोटोत सोनू ऑक्सिजन मास्क लावून रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसतो. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये तुम्हा सर्वांच्या काळजी आणि प्रेमाबद्दल धन्यवाद. मी काही दिवसापूर्वी एक कॉन्सर्टमधून परतलो होतो. हा फोटो शेअर करीत असताना कोणतीच फिकीर वाटत नसल्याचे म्हटले आहे.


आपल्या पोस्टमध्ये सोनू पुढे म्हणतो, आम्हा सर्वांसाठी हा एक धडा आहे. अॅलर्जी झाल्यानंतर बेफिकीर राहू नका. खासकरुन माझ्या केसमध्ये सीफूडपासून. माझ्या घरापासून जर नानावटी रुग्णालय जवळ नसते तर समस्या गंभीर झाली असती. सोनू निगमची तब्येत मुंबईच्या एका प्रसिध्द रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर खराब झाली. त्याला अॅलर्जी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. आता त्याची तब्येत सुधारत आहेत.

Leave a Comment