
मुंबई : इन्स्टाग्रामने वादग्रस्त आणि अश्लील मजकूरावर आळा घालण्यासाठी नवे फीचर आणले आहे. या फीचरचे नाव सेन्सिटिव्ह स्क्रीन असे आहे. अश्लील फोटो, व्हिडिओ, थंबनेल्सवर युजर जोपर्यंत क्लिक करत नाही तोपर्यंत ते या फीचरमुळे ब्लर दिसतील.
अल्पवयीन मुलांसाठी इन्स्टाग्रामचे नवीन फीचर
वोग को यूकेच्या रिपोर्टनुसार, हे फिचर भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या युजर्ससाठी आणण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो, सर्च, रिकमेंड किंवा सर्च केल्यानंतर अचानक अश्लील फोटो किंवा व्हिडिओ नजरेसमोर येतो. असा मजकूर अल्पवयीन मुलांसाठी धोकादायक असतो. त्यामुळे हे फीचर अशा अल्पवयीन मुलांना यापासून दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
‘द टेलिग्राफ’ला लिहिलेल्या पत्रात सेन्सिटिव्ह स्क्रीन फीचर सुरु केल्याची घोषणा इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मुसेरी यांनी केली. ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. आत्महत्येला प्रवृत्त करणारा मजकूर वाचल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केली होती, असा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या पालकांनी केला होता.
