जगातील या श्रीमंताला आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केले ब्लॅकमेल

jeff-bezos
आपल्या घटस्फोटामुळे अमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस बरेच चर्चेत आले होते. त्यांनी आता नॅशनल इन्क्वायरर टॅब्लॉइडवर ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप केला. बेजॉस यांनी म्हटले आहे की, त्यांचा आणि टीव्ही अँकर लॉरेन सांचेजचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी नॅशनल इन्क्वायररने दिली आहे. तसा धमकीचा मेलही पाठवला असल्याचे बेजॉस यांनी केलेल्या दाव्यात म्हटले आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून ते फोटो नॅशनल इन्क्वायररला कसे मिळाले याचा शोध घेत असल्याचे बेजॉसने म्हटले आहे. आता मी चौकशी बंद करावी यासाठी मॅगझिनचे प्रकाशक धडपडत आहेत आणि त्यासाठी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

जे काही माझा घटस्फोट आणि त्यानंतर सांचेजसोबतच्या नात्याबद्दल प्रसिद्ध झाले त्यात कोणताच राजकिय उद्देश नव्हता असे मी जाहीरपणे बोलावे असे नॅशनल इन्क्वायररच्या प्रकाशकांना वाटत असल्याचा दावा बेजॉसने केला होता. बेजॉस यांच्याबद्दलच्या बातम्यांना राजकारणाचा भाग असल्याचे आरोपही काहींनी केले होते.

इन्क्वायररने म्हटले होते की 455 कोटींच्या जेटमधून बेजॉसने सांचेजला फिरवले होते. त्यावेळी 5 राज्यात 40 हजार किलोमीटरपर्यंत ट्रॅक केल्याचा दावा इन्क्वायररने केला होता. मॅगझिनने बेजॉस आणि सांचेज यांच्या डेटचे फोटोही छापले होते. मॅगझिनने दावा केला आहे की, गेल्या काही महिन्यात बेजॉसने सांचेजला अनेक आक्षेपार्ह फोटो आणि मेसेज पाठवले आहेत. त्याचा 11 पानी अहवालात सर्व फोटो प्रसिद्ध करण्याचा दावाही इन्क्वायररने केला होता. दरम्यान बेजॉसने पत्रकारितेच्या विशेषाधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. मी या ब्लॅकमेलिंगला बळी न पडता त्याच्याविरोधात लढणार असल्याचे बेजॉसने म्हटले आहे.

Leave a Comment