टी२० सामन्यात सर्व बाद १० रन्सचे रेकोर्ड

allout
द. ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट टीमने स्थानिक टी २० स्पर्धा सामन्यात नवीनच विक्रम नोंदविला, नॅशनल इंडीजीनस क्रिकेट चँपियनशिप स्पर्धेत बुधवारी साउथ ऑस्ट्रेलिया महिला टीमला १० रन्सवर औट केले. विशेष म्हणजे या १० धावांपैकी ६ वाईड बॉलवर मिळाल्या होत्या आणि सलामीला आलेल्या फेबी मन्सेल हिने चार धावा काढल्या. त्याही ३३ चेंडू खेळून. बाकी सर्व खेळाडूना भोपळा फोडता आला नाही.

न्यू साउथ वेल्स महिला टीमने प्रथम गोलंदाजी केली. त्यांच्या गोलंदाजीचे पृथक्करण ०,४,०,०,०,०,०,०,०,०,० असे होते. म्हणजे फक्त एका खेळाडूचा चार धावा. बाकी शून्य. ही टीम फलंदाजीला उतरली तेव्हा त्याचीही सुरवात लडखडत झाली. त्यांनाही विजयासाठी आवश्यक ११ धावा करण्यासाठी २ षटके आणि ५ बॉल खेळावे लागले.

Leave a Comment