रोज शाळेसाठी परदेशात जातात ही मुले

mekxico
चांगले आणि मुलांच्या आवडीचे शिक्षण त्यांना मिळावे या साठी सर्व पालक प्रयत्नशील असतात. चांगली शाळा मिळावी यासाठी वेळप्रसंगी दुसऱ्या गावी अथवा बोर्डिंग स्कूल मध्ये मुलांना पाठविले जाते. जगात एक गाव असेही आहे जेथील मुले चांगले शिक्षण मिळावे म्हणून रोज परदेशात जातात आणि सायंकाळी शाळा सुटली कि घरी परत येतात.

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या कोलंबस एलिमेंटरी स्कूल मध्ये मुळात ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात त्यातील ४२० मुले रोज देशाची सीमा ओलांडून पासपोर्ट दाखवून शेजारील मेक्सिको देशातील प्योर्नो पालोसास मधून येतात. यातील काही मुलांचा जन्म अमेरिकेत झाला आहे पण तरीही त्यांना पासपोर्ट दाखविल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. सीमेवर पोहोचल्यावर या मुलांचे पासपोर्ट तपासले जातात आणि मग तेथे बस येते आणि त्यातून मुले शाळेत पोहोचतात.

मेक्सिको मध्ये शिक्षण स्पॅनिश भाषेत दिले जाते. आपल्याइकडल्या पालकांप्रमाणे मेक्सिकोतील पालकांना त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे असे वाटते आणि जगभरात इंग्रजी भाषा चालते त्यामुळे मुलांना रोज देशाची सीमा ओलांडून अमेरिकेत येऊन शिक्षण घ्यावे लागते.

Leave a Comment