
गेल्या अनेक दिवसांपासुन अनीस बझ्मी द्वारा दिग्दर्शित ‘पागलपंती’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. जॉन अब्राहम आणि इलियानाची जोडी या चित्रपटात झळकणार असल्याचे म्हटले जात होते. पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता चित्रपटाची दिग्गज स्टारकास्ट समोर आली आहे.
‘पागलपंती’मध्ये असणार आहे दिग्गज स्टारकास्ट
जॉन अब्राहम आणि इलियानाशिवाय चित्रपटात अनिल कपूर, अर्शद वारसी, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला, सौरभ शुक्ला, पुलकित सम्राट हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर भूषण कुमार आणि अभिषेक पाठक हे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याआधीही मुबारकाँ चित्रपटात बझ्मींसोबत इलियानाने काम केले आहे.
येत्या १७ फेब्रुवारीपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होत आहे. तर चित्रपट ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन आणि इलियानाची जोडी पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याने चाहतेही या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार असल्याचे म्हटले जात आहे.
