देव आनंद यांचा नातू ऋषी आनंद याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

dev-anand
गोविंदाचा गाजलेला चित्रपट ‘साजन चले ससूराल’च्या रिमेकमधून दिवंगत दिग्गज अभिनेता देव आनंद यांचा नातू ऋषी आनंद बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ऋषीसोबत ‘साजन चले ससूराल २’ या चित्रपटात चंकी पांडे, आर्य बब्बर, हेमंत पांडे, सोनल मोन्टेरिओ आणि इशिता राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. पहिल्या चित्रपटाची निर्मिती मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी केली होती. सिद्दीकीच याची निर्मिती करणार आहेत.

मी खूपच उत्साही आहे. चित्रपटाबद्दल आत्ताच भाष्य करणे खूप घाईचे होईल, असे ऋषीने म्हटले आहे. ‘साजन चले ससूराल’ हा विनोदी चित्रपट होता. यात गोविंदा, करिश्मा कपूर, तब्बू, कादरखान आणि सतीश कौशक यांच्या प्रमुख भूमिका होत्या. १९९६ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते.

अभिनेता – निर्माता सुनिल आनंद यांचा ऋषी हा मुलगा आहे. देव आनंद यांचा एकमेव मुलगा असलेल्या सुनिल यांनी ‘आनंद और आनंद’, ‘कार थिफ’ आणि मैं तेरे लिए या चित्रपटात काम केले होते. त्यांनी ‘मास्टर’ आणि ‘वेगाटर मिक्सर’ या इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.

Leave a Comment