विदर्भाने सलग दुसऱ्यांदा जिंकला रणजी चषक

ranji
सलग दुसऱ्या हंगामात मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने पटकावले आहे. विदर्भाने अंतिम सामन्यात सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली. विदर्भाचे हे दुसरे रणजी विजेतेपद ठरवले. विदर्भाने विजयासाठी दिलेले 207 धावांचे आव्हान पार करताना सौराष्ट्राचा संघ 127 धावांपर्यंतच मजल मारु शकला. विदर्भाच्या विजयात फिरकीपटू आदित्य सरवटेने मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या डावातही सौराष्ट्राच्या 6 फलंदाजांना पहिल्या डावात सौराष्ट्राच्या 5 फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या आदित्यने माघारी धाडले.

पहिल्या डावात आदित्य कर्णेवारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने 312 धावांपर्यंत मजल मारली. विदर्भाची धावसंख्या उभारण्यात मधल्या फळीतील फलंदाजांनीही मोलाची भूमिका बजावली. सौराष्ट्राने प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात 307 धावांपर्यंत मजल मारली. स्नेल पटेलच्या शतकामुळे एका क्षणापर्यंत मजबूत वाटणारा विदर्भाचा संघ मोक्याच्या क्षणी कोलमडला. पण कर्णधार जयदेव उनाडकट आणि चेतन साकरिया यांनी अखेरच्या विकेटसाठी भागीदारी रचत विदर्भाच्या गोलंदाजच्या नाकीनऊ आणले. आदित्य सरवटे आणि आणि अक्षय वाखरेच्या भेदक माऱ्यामुळे विदर्भाने पहिल्या डावात 5 धावांची निसटती आघाडी घेतली.

विदर्भाच्या संघातील अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही किल्ला लढवत संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. पहिल्या फळीत गणेश सतीश तर मधल्या फळीतल्या फलंदाजांपैकी मोहीत काळे, आदित्य सरवटे, अक्षय कर्णेवार, उमेश यादव यांनी छोट्या पण तितक्याच महत्वपूर्ण खेळी उभारल्या. अखेरीस 200 धावांवर विदर्भाचा दुसरा डाव आटोपल्यानंतर सौराष्ट्राला विजयासाठी 206 धावांचे आव्हान देण्यात आले.

सौराष्ट्राच्या फलंदाजांची दुसऱ्या डावातही पुरती भंबेरी उडाली. पहिल्या डावात शतक झळकावणारा स्नेल पटेलदेखील १२ धावांवर बाद झाला. यानंतर भरवशाच्या चेतेश्वर पुजाराला आदित्य सरवटेने शून्यावर माघारी धाडत सौराष्ट्राला मोठा धक्का दिल्यामुळे सौराष्ट्रची चौथ्या दिवसअखेर अवस्था ५ बाद ५८ अशी झाली. विश्वराज जाडेजाने पाचव्या दिवशी अर्धशतकी खेळी करत विदर्भाला झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने 52 धावांची खेळी केली. पण तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज फारकाळ मैदानावर टिकू शकले नाहीत. दुसऱ्या डावात विदर्भाकडून आदित्य सरवटेने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली, त्याने 6 फलंदाजांना माघारी धाडले. त्याला अक्षय वाखरेने 3 तर उमेश यादवने 1 बळी घेत चांगली साथ दिली.

Leave a Comment