सोनू भिडेची ‘तारक मेहता…’ मालिकेतून एक्झिट

nidhi-bhanushali
सब टीव्हीवरील आघाडीची मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. मालिकेतील ‘दया बेन’च्या एक्झिटनंतर आता आणखी एक कलाकार मालिका सोडण्याच्या तयारीत आहे. मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी ‘सोनू भिडे’ मालिका सोडणार आहे. मालिका सोडण्याचा निर्णय सोनू भूमिका साकारणाऱ्या निधि भानुशालीने घेतला आहे.

सध्या निधि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत असून ती मालिकामधून बाहेर शिक्षण पूर्ण करण्यासाठी पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील मीठीबाई कॉलेजमध्ये निधि शिकत आहे. तिला मालिकेमुळे अभ्यासावर लक्ष देता येत नसल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. अनेकदा सोनूला ‘तारक मेहता…’च्या सेटवर अभ्यास करताना पाहण्यात आलं आहे.

निधिच्या या निर्णयावर मालिकेच्या निर्मात्यांची कोणतीही समस्या नसून आधी निधिने तिचे शिक्षण पूर्ण करावे असे त्यांनी म्हटले आहे. निधिला शूटींगवेळी त्यांनी काही सूट देण्याचाही प्रस्ताव ठेवला होता. परंतु निधिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. निधिने आधीच्या ६ वर्षांपासून भूमिका साकारणाऱ्या ‘सोनू’ झील मेहताला रिप्लेस केले होते.

Leave a Comment