रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात

RBI
नवी दिल्ली – 2017 नंतर प्रथमच भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करत असल्याची घोषणा केली आहे. रेपो रेट 0.25 टक्क्यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय नाणेनिधी धोरण समितीने (एमपीसी) कमी केला. रेपो रेट कमी करण्याच्या समर्थनात 6 पैकी 4 सदस्यांनी मत दिले असून आता रेपो रेट 6.25 झाला आहे. यापूर्वी हा दर ऑगस्ट 2017 मध्ये कमी करण्यात आला होता. या निर्णयामुळे आपल्या होम लोन, ऑटो लोन आणि इतर कर्जांचा ईएमआय स्वस्त होऊ शकतात.

Leave a Comment