पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करु शकतात इरफान खान करिना कपूर

combo
गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा बॉलिवूडमध्ये अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता इरफान खान सामना करत होता. इरफानच्या तब्येतीत आता काही प्रमाणात सुधारणा झाली असून, मुंबईला तो परतला आहे आणि तो लवकरच कामावरदेखील परतणार असल्याचे म्हटले जात आहे.

प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद इरफान खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘हिंदी मीडियम’ चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाच्या यशानंतर आता दिग्दर्शक चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. इरफान याच्याच चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. इरफानने चित्रपटाची स्क्रीप्ट वाचली असून, त्याला ती आवडली असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, इरफानसोबत चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. अशात आता या रोलसाठी करिनाचे नाव समोर येत आहे. या चित्रपटाची स्क्रीप्ट करिनाने वाचली असून, ती तिला आवडली असल्याचे म्हटले जात असल्यामुळे, तिने होकार दिल्यास चित्रपटात प्रेक्षकांना इरफान खान आणि करिना कपूरची जोडी पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment