विश्वचषक स्पर्धेला मुकणार स्टीव्ह स्मिथ

steve-smith
मेलबर्न – यावर्षी होणा-या विश्वकरंडक स्पर्धेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी स्टीव्ह स्मिथच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे तो विश्वचषक स्पर्धेपर्यंत तंदुरुस्त होण्यावर प्रश्नचिन्ह आहेत.

याबाबत माहिती देताना स्मिथचा व्यवस्थापक वॉरेन क्रेग यांनी सांगितले, लवकरच स्मिथवर शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु, यानंतर त्याला शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी काही आठवड्यांचा कालावधी लागेल. जोपर्यंत संपूर्ण परिस्थिती कळत नाही. तोपर्यंत काहीच सांगितले जावू शकत नाही. खेळण्यासाठी तयार होण्यासाठी त्याला कमीत कमी ३ किंवा त्यापेक्षा जास्त आठवड्याचा कालावधी लागेल.

चेंडू छेडछाडप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर १ वर्ष बंदीची शिक्षा घालण्यात आली आहे. यांनतर दोघांनी जगातील वेगवेगळ्या टी-ट्वेन्टी लीगमध्ये सहभाग घेतला आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळताना स्मिथच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती. यानंतर, त्याने निम्यावरच लीग सोडून ऑस्ट्रेलियाला परतण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment