स्वीडिश पंतप्रधानांना सल्ला देणार बाळासाहेब विखे पाटलांची नात

neela-vikhe-patil
मुंबई – नीला विखे पाटील यांची स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटलांच्या त्या नात आहेत. शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या नीला या कन्या आहेत. स्विडनमध्ये नीला यांचा जन्म झाला असून, अहमदनगरमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. त्यांचे काका म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.

स्विडनचे पंतप्रधान केजेल स्टीफन लोफ्वेन यांच्या सल्लागार निला म्हणून काम पाहणार आहेत. पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणीचे काम नीला पाहतील. त्या स्विडनच्या स्विडीश ग्रीन पक्षाच्या सदस्य आहेत. त्यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवी व एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्यासोबतच माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचे शिक्षण घेतले आहे. अशोक विखे पाटील हे विखे पाटील शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. या शिक्षण संस्थेकडून १०२ शैक्षणिक संस्था चालवल्या जातात.

Leave a Comment