२००९ साली मी ताईंसाठी आमदारकी सोडली – धनंजय मुंडे

dhananjay-munde
मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याला प्रतिउत्तर देताना लोकभावना असतानाही ताईंसाठी मी आमदारकी सोडली होती. बहिणीच्या प्रचारावेळी घोषणा देणारा मी पहिला होतो, असे म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्यासाठी राजकारण सोडले असते असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. धनंजय मुंडे त्याला उत्तर देताना म्हणाले, की राजकारण त्यांनी सोडले असते की नाही हे माहीत नाही. पण मी २००९ साली निवडणूक लढवावी अशी लोकभावना असतानाही ताईंसाठी मी आमदारकी सोडली होती. बहिणीच्या प्रचारावेळी घोषणा देणारा मी पहिला होतो, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Comment