
बॉलीवूड दबंग हिरो सलमान खान प्रथमच टीव्हीसाठी सीरिअल निर्मिती करत असून जगप्रसिद्ध पहिलवान आणि हिंदू मुस्लीम एकतेचे उदाहरण ठरलेला गामा पैलवान यांच्या जीवनावर हि सीरिअल बनविली जात आहे. गामाची भूमिका सलमानचा भाऊ सोहेल खान करणार असून या मालिकेचे दिग्दर्शन पुनीत इस्सार करणार आहेत.
गामा पैलवानावर सलमान बनवितोय टीव्ही सीरिअल
सलमानला गामा पैलवान यांच्या जीवनावर चित्रपट बनवायचा होता पण ते शक्य न झाल्याने त्याने टीव्ही मालिका बनविण्याचा निर्णय घेतला असे समजते. या मालिकेचे शुटींग एप्रिल पासून सुरु होणार असून जुलैमध्ये ती प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शुटींग पंजाब आणि लंडन येथे केले जाणार आहे.
द ग्रेट गामा म्हणजे गुलाम मोहम्मद बक्ष भट्ट यांचा जन्म १८७८चा. ते काश्मिरी पैलवान होते. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले आणि तेथे त्यांचा १९६० साली मृत्यू झाला. १९१० साली ते वर्ल्ड हेवीवेट चँपियन ठरले होते. त्यांचा रोजचा आहार २ गॅलन दुध, १ किलो बदाम, ६ देशी कोंबड्या, अर्धा लिटर देशी तूप, खूप लोणी असा होता. ते दररोज ५ हजार बैठका आणि ३ हजार दंड मारत असत. कुंगफु मास्टर ब्रूस ली त्यांचा चाहता होता.
